आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाकीत:शिवसैनिकांशी बेइमानी करून सत्तेवर आलेले सरकार जास्त टिकणार नाही

परतूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि सर्व सामान्य शिवसैनिक यांच्याशी बेईमानी करून सत्तेवर आलेले सरकार जास्त काळ टिकणार नाही. ज्यांनी त्यांना सत्तेवर बसवल,े तेच त्यांना पायउतार करतील असे भाकीत परभणी लोकसभेचे खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केले आहे. सोमवारी परतूर विधानसभा मतदार संघातील पाटोदा गटाचा मेळावा केदारवाकडी संस्थान येथे आयोजित करण्यात आला होता.

या मेळाव्यात पदाधिकारी- कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना खासदार संजय जाधव बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ऐ. जे. बोराडे, उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब तेलगड, जिल्हा संघटक प्रा. माणिकराव थिटे, परतूर तालुकाप्रमुख सुदर्शन सोळंके, मंठा तालुका प्रमुख अजय अवचार, रामेश्वर नळगे, अंकुश अवचार,संतोष वरकड, संजय राठोड, गजानन पाटील, संजय गोंडगे, महेश नळगे, संदीप पाचारे, रामचंद्र काळे, विदुर जाईद, महिला आघाडीच्या बेबीताई पावसे, जयाताई पवार यासह इतर पदाधिकारी- कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी नगरविकास सारखे महत्वाचे खाते ज्यांना दिले, ज्यांना शिवसेनेने मोठे केले, तेच पक्षाशी बेईमान झाल्याची खंत पुढे बोलतांना खासदार संजय जाधव यांनी यांनी व्यक्त केली. राज्याची आर्थिकस्थिति बिकट असून अशा स्थितीत गुजरातसाठी तयार करण्यात येत असलेल्या बुलेट ट्रेन साठी तब्बल ६ हजार कोटी रुपये शिंदे सरकारने दिले आहेत. सततच्या पावसामुळे शेजाऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असतांना शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम राज्यातील शिंदे सरकारने केले असल्याची टीका यावेळी खासदार संजय जाधव यांनी केली.

खासदार जाधवांनी पुढे केले ए.जे. बोराडेंचे नेतृत्व परतूर विधानसभेसाठी ए.जे. बोराडेंना निवडून आणण्यासाठी तन-मन-धनाने प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी खासदार संजय जाधव यांनी जाहीर करून टाकले. परतूर विधान सभेवर शिवसेनेचा भगवा फडकावयाचा आणि आपल्या हक्काचा माणूस ए.जे.बोराडे यांना संधी द्यायची हा निश्चय करून शिवसैनिकांनी आजपासूनच कामाला लागावे. ए.जे. पाटील यांच्या रुपाने परतूर विधानसभेवर भगवा फडकण्यासाठी आपण तन-मन-धनाने प्रयत्न करू. आता पर्यंत केवळ मतासाठी मंठा तालुक्याचा विचार झाला, यावेळी आमदार मंठ्याचा व्हावा, यासाठी आता पासून कामाला लागा, असे आवाहन खा. संजय जाधव यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

बातम्या आणखी आहेत...