आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहक्काच्या पगारासाठी गेल्या वीस वर्षापासून सनदशीर मार्गाने प्रश्न सुटत नसल्यामुळे शेवटी रामतीर्थ स्मशानभूमीत चितेसमोर बसून अन्नत्याग आंदोलनास विना अनुदानित शिक्षकांनी सुरुवात केली आहे. शिक्षक हा ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतो शिक्षकांना पगार मिळू नये ही गोष्ट महाराष्ट्राला शोभणारी नाही. मुख्याध्यापक शिक्षक समन्वय संघातर्फे १ मे कामगार दिनापासून जालन्यातील रामतीर्थ स्मशानभूमीत विजय सुरासे, ज्ञानेश्वर चव्हाण, राजेभाऊ मगर या तीन शिक्षकांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे.या आंदोलनाला २५ शिक्षक संघटनांनी आजपर्यंत पाठिंबा दिला आहे. शिक्षकांनी राज्यकर्त्यांवर प्रचंड रोष व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील आमदारांचा निधी, त्यांच्या चालकांचे भत्ते व त्यांच्या निवासाची मुंबईत व्यवस्था यासाठी निधी उपलब्ध असतो.
फक्त विनाअनुदानित शिक्षकांच्या पगारासाठी शासनाकडे निधी नाही ही गोष्ट न पटणारी आहे. यावेळी भागवत मराठे, शंकर शेरे, ओम एखंडे, नारायण राजे भोसले, के. पी. पाटील, किरण धुळे, उमाकांत बोंमनाळे, माणिक राठोड, रफिक शेख, कैलास जगताप, कैलास कपाटे, अंकुश हाडे, खारतुडे, रामदास कुलकर्णी, गाडेकर, विठ्ठल ठोंबरे, संदीप पंडित उपस्थित होते. दरम्यान, आंदोलनस्थळी अमरावती शिक्षक आमदार किरण सरनाईक, जालना जिल्हा शिवसेनाप्रमुख भास्कर अंबेकर, शिक्षणाधिकारी श्रीमती मंगल धुपे, शिक्षण उपसंचालक सतीश सावंत, गटशिक्षणाधिकारी रवी जोशी, बाळासाहेब खरात आदींनी भेट दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.