आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना सोडल्या नंतर शिंदे गटात दाखल होताच माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही निवड जाहीर केली. दरम्यान, खोतकर यांनी सिल्लोड येथील सभेत शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समर्थनाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केले. यासंदर्भात माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या कार्यालयातून प्रसिद्धिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल्याचे म्हटले आहे. या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री अब्दुल सत्तार, उदय सामंत, संदिपान भुमरे, सुरेश नवले आदींची उपस्थिती होती. शिवसेनेच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले आहे, त्यात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पंडित भुतेकर, जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, युवा सेनेचे मराठवाडा विभागीय सचिव अभिमन्यू खोतकर, तालुकाप्रमुख संतोष मोहिते, अल्पसंख्याक प्रमुख सलमान खान पठाण, आत्मानंद भक्त, दिनेश फलके, विजय जाधव, फिरोजलाला तांबोळी, नरेश खुदभय्ये, पांडुरंग डोंगरे, सुधाकर वाढेकर, श्रीकांत घुले आदींचा समावेश असल्याची माहिती खोतकर यांच्या कार्यालयातून देण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.