आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:अंबड येथील बारवेत उडी मारून एकाची आत्महत्या

अंबड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील कावंदी गल्लीतील बारवेत एका अनोळखी व्यक्तीने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. मृत दुसऱ्या दिवशी फुगून पाण्यावर आला होता. मृताची ओळख पटवण्याचे काम पोलिस करत आहेत.

एक अनोळखी मनुष्य बारवेजवळ येऊन बसलेला असल्यामुळे मुलांनी त्यास “काय करता, कशासाठी आलात?’ असे विचारल्यानंतर त्याने “दुचाकी गॅरेजवर लावलेली आहे. दुचाकीचे काम सुरू आहे तोपर्यंत इथे बसत आहे,’ असे सांगून नंतर आठ ते दहा मिनिटांनी पायऱ्या उतरून बारवेत उडी मारली.

बातम्या आणखी आहेत...