आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:राष्ट्रवादीच्या वतीने मोर्चा काढून राजीनाम्याची मागणी

भोकरदन5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या नेतृत्वात भोकरदन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढून पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंडे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात माजी आमदार चंद्रकांत दानवे, युवा नेते सुधाकर दानवे तालुकाध्यक्ष रमेश सपकाळ, बनेखा पठाण माजी नगरसेवक शब्बीर कुरेशी, यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याच्या निषेध करुन आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...