आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:आत्माच्या नियामक मंडळाची बैठक

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतीला पूरक जोडधंदा निर्माण झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल. त्यामुळे ‘आत्मा’च्या माध्यमातून दुग्धव्यवसाय, रेशीम, मत्स्यव्यवसाय यासारख्या व्यवसायाच्या वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी ‘आत्मा’ नियामक मंडळाच्या बैठकीत दिल्या.

कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या नियामक मंडळाची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, आत्माच्या प्रकल्प संचालक शीतल चव्हाण, रेशीम विभागाचे अधिकारी अजय मोहिते यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...