आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवी अध्ययन निश्चिती स्तर राबवण्यात येणार असून या माध्यमातून मुलांच्या भाषा आणि गणित या दोन विषयांची अध्ययन पातळी उंचावण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम शासनाच्या धोरणानुसार जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. यासाठी पूर्वनियाेजन बैठक जिल्हा परिषदेत घेण्यात आली.
राज्य शासनाच्या मार्गदर्शक आदेशानुसार व जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात निपुण भारत मिशनअंतर्गत विद्यार्थ्यांच्या शालेय गुणवत्ता वाढीसाठी विविध नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवले जात असून या उपक्रमाबाबत मार्गदर्शन व्हावे म्हणून जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय सहायक, साधन व्यक्ती यांची जिल्हा प्रकल्प संनियंत्रण कक्षाची जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली.
या वेळी व्यासपीठावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे, उपशिक्षणाधिकारी विपुल भागवत, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता संजय येवते, अधिव्याख्याता डॉ. श्रीहरी दराडे, विनोद राख, प्रेरणा मोरे, सय्यद अख्तर, योगेश्वर जाधव, समग्र शिक्षा सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनील मावकर यांची उपस्थिती होती. दरम्यान, राज्य शासनाच्या मार्गदर्शक परिपत्रकानुसार जिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवी अध्ययन निश्चिती स्तर राबवण्यात येणार असून या माध्यमातून मुलांच्या भाषा व गणिताची अध्ययन पातळी उंचावण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
संकल्पनेनुसार हे पाहतील नियोजन
एफएलएन आधारित अध्ययन स्तर नियोजन ज्येष्ठ अधिव्याख्याता संजय येवते, प्रवेश आराखडा याविषयी प्रेरणा मोरे, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण अहवाल योगेश्वर जाधव, पीजीआय इंडिकेटर सय्यद अख्तर, आनंददायी अभ्यासक्रम अंमलबजावणी गटशिक्षणाधिकारी रवी जोशी, विद्यांजली पोर्टल नोंदणी विनोद राख, भाषा कृती कार्यक्रम विषय सहायक कैलास तिडके, गणित कृती कार्यक्रम साधन व्यक्ती रवींद्र कदम हे नियोजन पाहणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.