आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:मुंबईच्या अल्पवयीन मुलीस जालन्यात बोलावून अत्याचार, जालना शहरातील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जालना16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोकरी लावण्याचे आमिष दाखवल्याने मुंबईतून दोन अल्पवयीन मुली जालन्यात आल्या होत्या. त्या एकट्या असल्याचा फायदा घेऊन त्यांना विविध ठिकाणी नेऊन त्यापैकी एका मुलीवर सामूहिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी त्या मुलीच्या तक्रारीवरून जालना शहरातील तीन जणांना कदीम पोलिसांनी सोमवारी सकाळी बेड्या ठोकल्या. अविनाश जोगदंड, किशोर जोगदंड, गणेश मामा (पूर्ण नाव माहीत नाही), दीपक राणा अशी संशयितांची नावे आहेत. दीपक सध्या फरार आहे.

मुंबई येथील एका अल्पवयीन मुलीवर ३ सप्टेंबर ते ऑक्‍टोबर २०२१ दरम्यान जालना शहरात विविध ठिकाणी नेऊन सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप मुंबई येथील अल्पवयीन मुलीने केला आहे. याबाबत औरंगाबादच्या सिडको पोलिस ठाण्यात झीरो एफआयआर दाखल झाला. अल्पवयीन मुलगी जालना येथे नोकरीसाठी आली होती. या वेळी जालना शहरात राहणाऱ्या अविनाश जोगदंड, किशोर जोगदंड, दीपक राणा, गणेश (मामा) यांनी सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप या युवतीने दिलेल्या फिर्यादीत केला. काल रात्री उशिरा हा गुन्हा कदीम जालना पोलिस ठाण्यात वर्ग होताच गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक योगेश चव्हाण, बाबा गायकवाड यांनी संशयित आरोपी अविनाश काकासाहेब जोगदंड यास नांदेड येथून रेल्वेने येत असताना जालना रेल्वेस्थानकावर ताब्यात घेतले, तर शुभम काकासाहेब जोगदंड आणि गणेश (मामा) यांना सकाळी सदर बाजार पोलिसांनी अटक केल्याची माहिती एपीआय चव्हाण यांनी दिली. सध्या हे आरोपी कदीम पोलिसांच्या ताब्यात आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रियांका तुपे करीत आहेत. दरम्यान, या आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...