आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा:जिद्द, चिकाटी असेल तरच खेळाडू घडू शकतो

भोकरदन10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हल्लीचे युग हे धावपळीचे आहे. तसेच इलेक्ट्रॉनीक साधने करमणुकीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे अनेकजण मैदानावर खेळायला जाणेच विसरले आहेत. परंतु, त्याचे दुष्परिणामही भोगावे लागत आहेत. त्यामुळेच सर्वांगीण विकासासाठी मैदानी खेळ हे खूपच गरजेचे आहेत. या खेळामुळे खेळाडूच्या अंगी चपळता, अचुकता व चांगली निर्णय क्षमता वाढते. सर्वच क्षेत्रात आत्मविश्वास वाढविण्यासाठी खेळाचा फार मोठा फायदा असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या खेळात जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा, तसेच जिद्द आणि चिकाटी असेल तरच खेळाडू घडू शकतो असे प्रतिपादन रामेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एफ. इंगळे यांनी केले.

तालुकास्तरीय हॉलीबाल स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विजय सोनवणे, तालुका क्रीडा संयोजक कृष्ण जंजाळ, प्रा. रमेश गावंडे, प्राचार्य त्रिभुवन, प्राचार्य सपकाळे, किरण साळवे, प्रा. अशोक नवगिरे, व्ही. एन. पाटील, अजय मतकर, नितीन बोर्डे, बाबासाहेब सहाने, कोरके, खाडे आदी उपस्थित होते. श्री रामेश्वर कनिष्ठ महाविद्यालय येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील हॉलीबॉल या खेळात प्रकारात तालुक्यातील अनेक शाळा महाविद्यालय यातून २४ संघांनी सहभाग घेतला.

१४ वर्षे वयोगटात मुलींचा संघ श्री गणपती इंग्रजी स्कूल यांनी बाजी मारली तर मुलांचा श्री गणपती इंग्लिश स्कूल भोकरदन हे विजयी तर सतरा वर्ष वयोगटातील मुलींचा पायोनियर सीबीएससी इंग्लिश स्कूल जोमाळा यांनी बाजी मारली, तर अत्यंत चुरशीच्या सामन्यात मुलांचा ओम शांती विद्यालय बरंजळा साबळे या विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळून विजय मिळवला. तसेच १९ वर्ष वयोगटातील श्री रामेश्वर कनिष्ठ महाविद्यालय भोकरदन यांचा मुलींचा व मुलांचा संघ प्रथम क्रमांकाने विजय झाले. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मणराव गिऱ्हे, केशव जंजाळ, प्राचार्य नंदकुमार गिऱ्हे, प्राचार्य एस. एफ. इंगळे, श्रीकृष्ण जंजाळ तसेच प्रा. रमेश गावंडे यांनी विजय संघाचे अभिनंदन केले. याप्रसंगी प्रा. आंधळे, प्रा. आराक, प्रा. वाकेकर, प्रा. शेळके, प्रा. समाधान जंजाळ, प्रा. ठोंबरे, प्रा. साळवे, प्रा. नाईक, प्रा. भांदरगे यांच्यासह शिक्षक प्रशिक्षक, खेळाडू उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...