आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसतिगृहास भेट:नगराध्यक्ष असताना दिला होता मराठा वसतिगृहासाठी भूखंड

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा सेवा संघाच्या वतीने भाग्यनगर येथे बांधकाम मराठा समाजातील मुलींसाठी वसतिगृह बांधण्यात येत आहे. या कामाची आमदार कैलास गोरंट्याल यांनी पाहणी केली. आमदार गोरंट्याल हे १९९५ ला जालना नगरपालिकेचे नगराध्यक्ष असताना त्यांनी या वसतिगृहासाठी भूखंड उपलब्ध करुन दिला होता.

आमदार कैलास गोरंट्याल यांनी या वसतीगृहाच्या कामाची पाहणी केली. बांधकाम पाहुन त्यांनी समाधान व्यक्त केले. १९९५ मध्ये त्यांनी या वसतिगृहासाठी जालना शहरातील भाग्यनगर येथे १७ हजार चौरस फुटांचा भूखंड दिला होता. त्याशिवाय २००२ मधे आमदार गोरंट्याल यांच्या आमदार निधीतून पुर्व बाजुच्या सभागृहाचे बांधकाम करण्यात आले.

दरम्यान गोरंट्याल यांनी कामाची पाहणी केल्यानंतर मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव काकासाहेब खरात यांनी मराठा सेवा संघाच्या वतीने त्यांचे स्वागत केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निसार देशमुख, शहराध्यक्ष नंदुभाऊ जांगडे, बबलू चौधरी, शिवसेना(उध्दव ठाकरे) गटाचे उपजिल्हाप्रमुख रमेश पाटील गव्हाड, जि.प.सदस्य राम सावंत, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शेख महेमूद, नगरसेवक अरुण मगरे, योगेश पाटील, दत्ता घुले, प्रा. रमेश गजर, मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष बबन जंजाळ, जिल्हा संघटक विश्वनाथ काळे, संतोष चाळसे हे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...