आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 पोलिस मित्र नियुक्त:उत्सवात पोलिस मित्र हेसुद्धा एक जबाबदार रक्षक : मोरे

वाटूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सण-उत्सवाच्या काळात असामाजिक तत्त्वांकडून समाजात अशांतता पसरवण्याचे प्रयत्न केले जात असतात. असामाजिक तत्त्वांच्या आशा प्रयत्नांना वेळीच आवर घालण्यासाठी पोलिस प्रशासन कायम तत्पर असते. उत्सवाच्या काळात अधिक बंदोबस्त लावावा लागत असल्याने अनेक ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता भासते. कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी या काळात पोलिस प्रशासनापुढे असते. अशा वेळी पेालिस मित्र हे सुध्दा जनतेचे एक जबाबदार रक्षक असतात, असे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे यांनी केले.

सामाजिक दायित्व जपणाऱ्या युवकांचे पोलीस प्रशासनाला सहकार्य लाभावे या हेतूने पोलीस मित्र संकल्पना अनेक ठिकाणी राबविली जाते. ज्या समाजातून हे पोलिस मित्र येतात त्या समाजातील सर्वांशी ते परिचित असल्याने बहुतांश वेळा असामाजिक तत्वांना पुरेसे पाठबळ मिळत नाही. आपण समाजाचा एक जबाबदार घटक असून समाजात शांतता राखणे हे आपले प्राथमिक कर्तव्य असल्याची भावना पोलीस मित्रांच्या मनात निर्माण होते.

पोलिस मित्रांच्या सहकार्याने स्थानिक पातळीवरचे सण-उत्सव, कार्यक्रम शांततेत पार पाडता येत असल्याने समाजात पोलिस मित्रांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत परतूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे यांनी व्यक्त केले आहे. परतूर पोलिस स्टेशन अंतर्गत नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या १०० पोलीस मित्रांना गणवेशाचे वाटप रविवारी सकाळी ११ वाजता पोलीस स्टेशन येथे करण्यात आले,

यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, डॉ.संजय पुरी, प्रा.संभाजी तिडके, रमाकांत बरीदे, सहायक पोलिस निरीक्षक सचिन पुंडगे, पोलिस उपनिरीक्षक नितीन गट्टूवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पोलीस मित्रांची भूमिका लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली परतूर कार्यक्षेत्रातील ५ पोलीस स्टेशनमध्ये एकूण ५०० पोलीस मित्रांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती पुढे बोलतांना मोरे यांनी दिली आहे. आगामी काळात महिला आणि मुलींनाही पोलीस मित्र म्हणून जबाबदारी देण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही डीपायएसपी राजु मोरे यांनी यावेळी सांगीतले.

बातम्या आणखी आहेत...