आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छापा:मंगरूळ येथील जुगाराच्या अड्डयावर पोलिसांचा छापा

तीर्थपुरी14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिसांनी मंगरूळ येथे छापा टाकून १ लाख ३५ हजार ५२० रुपयांचा ऐवज जप्त केला.गोंदी पोलिस ठाणेअंतर्गत तीर्थपुरी दुर क्षेत्र चौकीच्या हद्दीतील मंगरूळ येथे गुप्त खबऱ्या मार्फत गोदावरी नदीच्या काठी बंधाऱ्याजवळ झन्ना मन्ना नावाचा पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. या अड्ड्यावर तीर्थपुरी दुर क्षेत्र चौकीवरील एपीआय दीपक लंके व बिट जमादार नारायण माळी यांच्यासह पोलिसांनी छापा टाकला असता तेथे सहा जण पत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आले.

पोलिसांना पाहताच पाच जण पळून गेले. जालिंदर बापूराव मुंजाळ याला पोलिसांनी पकडून विचारपूस केली. पोलिसांनी जालिंदर मुंजाळ याच्याकडून नगदी २० हजार ५२०, दोन दुचाकी १ लाख १० हजार, एक मोबाईल ५ हजार रुपये, पत्त्यांचे साहित्य असे एकूण १ लाख ३५ हजार ५२० रुपयांचा ऐवज जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...