आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश विसर्जन मिरवणूक:विजेची तार पडली; सतर्कतेने हानी टळली

आन्वा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील आन्वा येथे गणेश विसर्जन मिरवणूक रात्री आठ वाजता सोनार गल्लीत आली असता सर्वात शेवटी कालिंका गणेश मंडळाचा गणपती होता. यावेळी डॉ. मोरे यांच्या घरासमोरील विजेच्या खांबावरील तार तुटून खाली पडली. विशेष म्हणजे तारेत प्रवाह होता. सुदैवाने लेझीम पथक बंद होते आणि गणेश भक्त कैलास खंडेलवाल यांनी आयोजित केलेल्या फराळासाठी दुसरीकडे एकत्र बसलेले होते. यामुळे मोठी हानी टळली.

यावेळी रस्त्यावर उभी असलेली मुलगी अनुराधा ज्ञानेश्वर हिंगे, ओम दुर्गादास चोथे, गोविंद वडगावकर, लता गुंड यांना विजेचा हलक्या स्वरूपाचा धक्का बसला. अचानक विजेचा तार मिरवणुकीच्या वेळी पडल्याने एकच गोंधळ उडाला. सतर्क नागरिकांनी वीज मंडळाशी संपर्क केला, तत्काळ लाईनमन एस. वाय. भोकरे व राम हजारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ वीजप्रवाह बंद केला. उत्सव काळात मिरवणुकीवर जीर्ण झालेला तार पडली. गणेशोत्सवापूर्वी आन्वा येथे शांतता कमिटीच्या झालेल्या मीटिंगमध्ये वीज मंडळाच्या जीर्ण तारेचा विषय झाला होता. परंतु वीज मंडळाने यावर काहीच कारवाई केली नाही. यामुळे नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...