आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:लक्ष्मीचा सरस्वतीसाठी खऱ्या अर्थाने सदुपयोग

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक कार्यासाठी लाखो रुपये सीएसआर फंडातून देण्याची अनेकांची तयारी आहे. मात्र, त्याचा लाभ खऱ्या अर्थाने गरजू आणि गरिबापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी घेण्यासाठी कोणी पुढे धजावत नाहीत. मात्र, ग्राउंड लेव्हलवर काम करणारे प्रा. सुरेश लाहोटी गरजू व्यक्तींचा शोध घेऊन, त्यांना मदतीचा हात देण्याचे काम करत आहेत. अशा या संस्थेला झोन चेअरमन सुशील पांडेय आणि रॅपिडचे अध्यक्ष ललित कामड करीत असलेली मदत म्हणजे लक्ष्मीचा ज्ञानाची देवता सरस्वतीसाठी खऱ्या अर्थाने सदुपयोग होय, असे गौरवोद्गार यांनी काढले.

झोन चेअरमन सुशील पांडेय यांनी जालना एज्युकेशन फाउंडेशनच्या मोफत कोचिंग क्लासेस आणि पढो जालना प्रकल्पातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांसाठी पाचशे वह्या आणि पेन जयपुरिया यांच्या हस्ते सुपूर्द केले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रा. सुरेश लाहोटी, अशोक हुरगट, किशोर गुप्ता, रामकुवर अग्रवाल, कमलकिशोर गोयल, अशोक मिश्रा, फाउंडेशनचे प्रा. स्वप्निल सारडा, संतोष जाधव, दिलीप केंद्रे, रुक्मिणीकांत दीक्षित आदींची उपस्थिती होती

बातम्या आणखी आहेत...