आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:कृषी क्षेत्रात ड्रोन वापराबाबत शुक्रवारी चर्चासत्र

जालना16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शुक्रवारी कृषी विज्ञान मंडळाच्या ३०० व्या मासिक चर्चासत्रानिमित्त शेतकऱ्यांसाठी ‘कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. सुनील गोरंटीवार हे प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. त्यासोबतच ‘कीटकनाशकांचा सुरक्षित वापर’ या विषयावर धानुका अॅग्रीटेकचे तज्ज्ञ घनश्याम इंगळे हे मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक कृषिरत्न विजयअण्णा बोराडे हे राहणार असून आयसीएआर-अटारीचे निवृत्त संचालक डॉ. लाखन सिंग यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. भारत सरकारच्या शेती क्षेत्रातील ड्रोनच्या वापरास प्रोत्साहन देण्याच्या धोरणानुसार सदरील चर्चासत्र शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणार आहे. तसेच कृषी विज्ञान मंडळाने आपल्या नियमित चर्चासत्रांची परंपरा कायम राखत अखंडपणे ३०० चर्चासत्रांचा टप्पा पूर्ण कला असून या कार्यक्रमास शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख एस. व्ही. सोनुने यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...