आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसाराची होळी:लिंबोना येथे शॉर्टसर्किटमुळे घराच्या शेडला लागली आग; एक जण जखमी

मंठा2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मंठ्यापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या लिंबोना येथे गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास परसराम रेखा चव्हाण यांच्या शेतातील शेडला आणि गोठ्याला आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये शेतमालाचे मोठे नुकसान झाले असून आग गोठ्याकडे जात असताना गुराढोरांना वाचविण्याच्या प्रयत्नात परसराम चव्हाण हे जखमी झाले आहेत.

मंठा तालुक्यातील लिंबोना येथील शेतकरी परसराम चव्हाण यांनी शेतमालाच्या साठवणीसाठी शेतात घरासाठी आणि गोठ्यासाठी सुमारे ६० फुटांचे शेड बांधले. गुरुवारी त्यांच्या या शेडला आणि गोठ्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत कापूस, ठिबक सिंचनाचे साहित्य, तूर, गहू, सोयाबीन यासारखा शेतीमाल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. आगीचे स्वरूप भयावह असल्यामुळे बघता बघता संपूर्ण शेड आणि गोठा जाळून खाक झाला. या दुर्घटनेत नेमके नुकसान किती झाले हे उशिरापर्यंत पंचनामा न झाल्यामुळे कळू शकले नाही. दरम्यान, या घटनेतील जखमी शेतकऱ्याला पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...