आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालकावर कारवाई:तळणी गावात एकच पंप, पेट्रोल, डिझेलचा कायमस्वरूपी ठणठणाट

तळणी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंठा तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या तळणीतील एकमेव असलेल्या पेट्रोल पंपावर नेहमीच पेट्रोलचा ठणठणाट असल्याने वाहनधारक वैतागून गेले आहेत. एक तर हा पंप गावापासून दोन किलोमीटरवर आहे.पेट्रोल नसले की विनाकारण जाणा येण्याचा त्रास सहन करावा लागतो.

तळणी परिसरातील आजुबाजुला जवळपास पंधरा ते वीस गावे आहेत. तळणीत पेट्रोल उपलब्ध नसले विदर्भातील लोणार येथे जावे लागते. शेगाव पंढरपूर मार्ग झाल्यामुळे या रस्त्यावरून वाहनांची मोठी ये जा वाढली आहे. तसेच हा पंप रात्रीच्या वेळी पूर्णपणे बंद असतो. सकाळी पंप चालू होईपर्यंत वाहनचालकाना पंप सुरू होण्याची वाट पहावी लागते. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, तळणी येथील पंपावर पेट्रोल नसणे हे नित्याचे झाले आहे. लोणारला जाणे परवडत नाही. तसेच वेळही जातो. इतरञ खासगी ठिकाणी पेट्रोल शिल्लक पैसे देऊन घ्यावे लागते संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन पेट्रोल पंप चालकावर कारवाई करण्याची मागणी वाहनधारक सिध्देश्वर सरकटे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...