आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणा:श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा पुतळा शहरात बसविणार; माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची घोषणा

जालना18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपालिका ताब्यात येताच श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा पुतळा आगामी काळात शहरात बसविणार असल्याची घोषणा माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केली.

शहरातील मराठी कन्या पाठशाळाजवळील पेशवे चौकाचा लोकार्पण सोहळा अक्षयतृतीया व परशुराम जयंतीला मंगळवारी संपन्न झाला. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते या चौकाचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कराव अंबेकर, शिवसेना शहरप्रमुख विष्णु पाचफुले, पंडित भुतेकर, अरविंद देशमुख, भरत सांबरे, दिपक डोंगरे, माजी नगरसेवक सुनिल पवार, ईश्वर बिल्लोरे, समस्त ब्राह्मण समाज मुख्य समन्वयक दिपक रनणवरे, सुरेश मुळे, अॅड सुनिल किनगावकर, राजेश काजळकर, धनसिंग सूर्यवंशी, आशोक पडुळ, अमित कुलकर्णी, सुमित कुलकर्णी, गंगुबाई वानखडे आदींची उपस्थित होती. यावेळी पुढे बोलतांना खोतकर यांनी माजी नगरसेवक विजय पवार यांच्या विकास कामाबाबतीत समाधान व्यक्त करुन त्यांच्या कार्याचा गौरव केला. विजय पवार यांच्या प्रयत्न पुढाकाराने पेशवे चौकाचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे.

विजय पवार यांनी पेशवे चौकाबाबतीत सातत्याने माझ्याकडे मागणी धरली. आज त्यांच्या मागणीला प्रत्यक्षात यश मिळाले असल्याचे या लोकार्पण सोहळा कार्यक्रमातुन दिसून येत आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कराव अंबेकर यांनी श्रीमंत बाजीराव पेशवे चौकात नगर विकास खात्याच्या निधीतुन हाय मॅक्स बसविणार असल्याची घोषणा केली. माजी नगरसेवक विजय पवार यांनी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या आमदार निधीतून श्रीमंत बाजीराव चौकाचे विकास कामे झाले असुन हायमॅक्ससाठीही पाठपुरावा करुन लवकरच हाय मॅक्स बसविणार असल्याचे या वेळी सागितले.

बातम्या आणखी आहेत...