आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना:अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी जालन्यात दीड कोटी खर्चून साकारणार स्टडी सेंटर

जालनाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील आझाद मैदानाजवळील नगरपालिकेच्या शाळेत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरिता अद्ययावत स्टडी सेंटर बांधले जाणार आहे. यासाठी दीड कोटीच्या निधीच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. तर पहिल्या टप्प्यात केंद्र व राज्य शासनाकडून अनुक्रमे ४५ लाख व ३० लाख याप्रमाणे ७५ लाखांचा निधी राज्याच्या अल्पसंख्याक विभागाकडून जिल्हास्तरावर वितरीत करण्याचे आदेशही निघाले असून ३१ मार्च रोजी हा निधी वर्ग झाला आहे. प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाकडून गठीत शक्तिप्रदान समितीने सर्वप्रथम या बांधकामासाठी दीड कोटी रुपये रकमेच्या प्रस्तावास मान्यता दिलेली आहे. केंद्र व राज्य हिस्सा ६०:४० याप्रमाणे केंद्राकडून ९० लाख तर राज्य शासनाकडून ६० लाख रुपये खर्च होणार आहे. यातील ७५ लाख रुपये जिल्हाधिकारी यांच्याकडे वितरीत करण्याचा शासन निर्णय ३० मार्च रोजी राज्याच्या अल्पसंख्याक विभागाकडून काढण्यात आला. तर अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देताना सदरील स्टडी सेंटरचे व्यवस्थापन, बांधकामाचे गुणवत्ता नियंत्रण, पर्यवेक्षण आणि मुदतीत काम पूर्ण करण्याची जबाबदारी नगरपालिकेवर टाकण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत केली जाणार आहे.