आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातीर्थपुरी ते घनसावंगी रस्त्यावर उसाच्या ट्रॉलीला धडकून एकाच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ७ ते ८ वाजेदरम्यान घडली. एकनाथ पंडित जाधव रा. बानेगाव ता. घनसावंगी असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. रस्त्याने जाणारे पुरुषोत्तम उढाण यांनी अॅब्युुलन्स बोलावून मृताला घनसावंगी येथील उपजिल्हारुग्णालयात नेण्यास मदत केली.
सदरील उसाची ट्रॉली ही दुपारी पलटलेली होती परंतु त्या ट्रालीला अंधारात लाईटने चमकणारे रेडियम नव्हते आणि त्या ट्रॅक्टर चालकाने ट्रॉलीच्या आजूबाजूला दगडकिंवा स्टॉप सिग्नल असं काही ठेवलेले नव्हते म्हणून मोटरसायकल चालकाला ही ट्रॉली जवळ येईपर्यंत दिसली नाही आणि हा अपघात झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.