आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवापुस्तके पडताळणी:सेवापुस्तके पडताळणीसाठी आज शहरात येणार पथक

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पडताळणी करण्यासाठी वेतन पडताळणी पथक मराठवाड्यात येत आहे. यात औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यातील व तालुकास्तरीय सर्व कार्यालयांसाठी २२ ते २५ नोव्हेंबर तर लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व कार्यालयांसाठी २६ ते ३० नोव्हेंबर असा कालावधी राहणार आहे.

औरंगाबाद मुख्यालयी दौऱ्याच्या ठिकाणी ३१ मार्च २०२३ पर्यंत सेवानिवृत्त होणारे व झालेले अधिकारी, कर्मचारी तसेच न्यायालयीन, लोकायुक्त प्रकरणे यांची मुळ सेवा पुस्तके प्राधान्याने निकाली काढण्याच्या दृष्टीने दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...