आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायरगाडी कोसळली:ऊस घेऊन जाणारी टायरगाडी रस्त्यावरून खड्ड्यात कोसळली

वडीगोद्री5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साखर कारखान्याकडे ऊस घेऊन येणारी टायरगाडी पाथरवाला बुद्रुक येथे पुलाच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजता गोंदी-शहागड मार्गावर घडली.

अंबड तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक येथे पुलाचे काम सुरू आहे. गोंदीकडून कारखान्याकडे ऊस टायरगाड्या जात असताना एक ऊस टायरगाडी पुलाच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडली. गाडी खड्ड्यात पडल्यानंतर तिला दोरखंड बांधून पोकलेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. यात ऊसतोड कामगार विलास काळे (रा. वैतागवाडी, गोंदी) हा किरकोळ जखमी झाला. रस्ता चांगला नसल्याने ऊस टायरगाडीचे अपघात होत आहेत. यामुळे पुलाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ऊस टायरगाडी नेेण्यासाठी चांगला रस्ता करावा. तसेच पुलाचे काम लवकर करावे, अशी मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...