आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊर्जा:थकवा-मरगळ आलेल्या जिवास संगीतातून ऊर्जा मिळते

जालना12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भावनांचा निचरा होण्यासाठी व्यक्त होणे गरजेचे अाहे. थकवा, मरगळ आलेल्या जिवास संगीताद्वारे नवऊर्जा प्राप्त होते.,असे प्रतिपादन उद्योजक सुनील रायठठ्ठा यांनी केले.

आयएमए हॉल येथे जालना जिल्हा सांस्कृतिक मंचच्यावतीने आयोजित “व्हाईस ऑफ जालना” स्पर्धा उपांत्यपूर्व फेरीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कुबेर ग्रुपचे चेअरमन गौतमसिंह मुणोत, डॉ. दीपक मंत्री, डॉ. आरती मंत्री, रेखा अग्रवाल, सरला अग्रवाल, संगीतकार शैलेंद्र टिकारिया, परिक्षक राजेश जैस्वाल, मृणाली वाहने, मिलिंद दुसे, सिद्धांत टिकारिया यांची उपस्थिती होती. रायठठ्ठा यांनी जालना शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या फुलंब्रीकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी कलावंतांसह सर्व स्तरातून दबाव गट निर्माण झाला पाहिजे, असे नमूद केले. प्रास्ताविकातशैलेंद्र टिकारिया यांनी सोमवारी दानकुंवर महाविद्यालयाच्या प्रांगणात उपांत्यपूर्व आणि महाअंतिम फेरी बॉलीवूड संगीतकारांच्या उपस्थितीत होणार असल्याचे स्पष्ट केले. सुत्रसंचालन भावना सारडा यांनी तर मिलिंद दुसे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...