आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 अर्ज:श्री क्षेत्र जाळीचा देव ग्रामपंचायतीसाठी आले एकूण 13 अर्ज

धावडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील जाळीचा देव येथील ग्रामपंचायतच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकी च्या सरपंचपदाच्या व सदस्य पदासाठी नामाकन भरण्यासाठी शुक्रवारी अंतिम मुदत होती. येथील जागांसाठी एकूण २५ जणांनी अर्ज भरले आहेत.

दरम्यान, शेवटच्या दिवशी सरपंच पद सर्वसाधारण आरक्षण निघाल्याने त्यासाठी १३ जणांनी अर्ज भरले आहेत. त्यात २ महिला व ११ पुरुषांनी अर्ज भरले तर ७ सदस्या जागा असलेल्या ग्रामपंचायत सदस्यासाठी १२ जणांनी आपले उमेदवारी अर्ज भरले त्यात ४ महिला व ८ पुरुषांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले.

यात बप्पासाहेब उदरभरे यांनी सरपंचपदासाठी ही व सदस्यासाठीही असे दोन अर्ज भरले तर सरपंचपदासाठी दोन माझी सरपंच सखुबाई नानोदा अंबेकर, व दामूअण्णा उदरभरे यानीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून येथे यावेळेस कोण्त्याच पक्षाचे पँनल नाही सर्वच सरपंचपदाचेही व ग्रामपंचायत सदस्य ही सर्वच स्वतंत्र आहे. यातील एका क्रमांकाच्या वार्डातील १ सर्वसाधारण महीला व १ ओबीसी महिला यांच्या विरोधात कोणीच उमेदवारी अर्ज दाखल न केल्याणे त्या छानणीच्या दिवशी बिनविरोध घोषीत केल्या जाणार आहेत. यामुळे या वार्डातील प्रक्रीया निवडुकीत मंदावलेली असेल

बातम्या आणखी आहेत...