आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील विश्वकर्मीय समाजबांधवाच्या वतीने शुक्रवारी विश्वकर्मा जयंतीनिमित्त मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात श्रीकृष्णा लाॅन्स येथून ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहनसेठ हिवरकर, सेवानिवृत्त नायब तहसीलदार कृष्णराव सोनवणे, डाॅ. राम सोनवणे, ओमजी जांगिड, किशोर शर्मा यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवुन करण्यात आली.
ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिल्लोड रोड, महात्मा फुले चौक, रोकडा हनुमान चौक, सराफा मार्केट, सिल्लोड कार्नरमार्ग काढून संत नरहरी महाराज मंदीराजवळ रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीमुळे भोकरदन शहर भगवेमय झाले होते. यानंतर संत नरहरी महाराज मंदीरात श्री भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादुसिंग राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कृष्णासेठ हिवरकर, तरून पानसरीया, गजानन सोनवणे, गणेश इंगळे, किशोर सराफ, प्रकाश सोनवणे, विलास सोनवणे, योगेश शर्मा, मधुकर सोनवणे, बाळासाहेब सोनवणे, भगवान सोनवणे, बबनराव सोनवणे, गणेश सोनवणे, रवींद्र सासमकर, पत्रकार दीपक सोळंके, वैभव सोनवणे, निखिल वाळेकर, सागर हिवरकर, विनायक सोनवणे, मनोज दुसाने, संजय सोनवणे, सुनिल सावंत, राजु सोनवणे, नवनाथ खरोटे, सोमिनाथ सोनवणे, कृष्णा पळसकर, तुषार सोनवणे, किशोर गडकर, वैजीनाथ सोनवणे, विकास हिवाळे, श्रीनिवास परदेशी यांच्यासह विश्वकर्मीय समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.