आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रेचे स्वागत:परशुराम कुंड यात्रेतून राष्ट्रीय एकता आणि सामाजिक समरसतेचे दर्शन

जालना6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृत भारत रथ परशुराम कुंड आमंत्रण यात्रेचे प्रत्येक जिल्ह्यात स्वागतासाठी उत्स्फूर्तपणे हिंदू समाजातील महिला पुरुष एकत्र येत असल्यामुळे राष्ट्रीय एकता आणि सामाजिक समरसतेचे दर्शन यात्रेतून होत असल्याचे विप्र फाउंडेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा परशुराम कुंड तीर्थ विकास समितीचे कोषाध्यक्ष आर.बी. शर्मा यांनी सांगितले.

भारतातील पूर्वोत्तर अरुणाचल प्रदेशातील लोहित जिल्ह्यातील परशुराम कुंड तीर्थस्थान येथे भगवान परशुराम यांचे पंचधातू युक्त ५१ फूट उंच मूर्ती निर्माण कार्याचे दायित्व केंद्र सरकार व अरुणाचल प्रदेश सरकारने विप्र फाउंडेशन राष्ट्रीय संघटन कोलकत्ता यांना दिले आहे. त्यानिमित्ताने तमिळनाडू राज्यातील कांचीपुरम येथून निघालेली अमृत भारत रथ परशुराम कुंड आमंत्रण यात्रा विविध जिल्ह्यातून जात असताना जालन्यात आली असता विप्र फाउंडेशनतर्फे स्वागत करण्यात आले. श्री पाताळ हनुमान मंदिरापासून पदयात्रा काढण्यात आली यात वारकरी, टाळकरी, बँड पथका सह मोठ्या संख्येने महिला, पुरुष सहभागी झाले होते जय परशुरामच्या गजराने परिसर दुमदुमून गेला.

राम मंदिरात महाआरती करून यात्रेच्या आगमनानिमित्त रथासोबत मोटरसायकल रॅली मोतीबाग पर्यंत काढण्यात आली. यावेळी चौका चौकात परशुराम कुंड रथाचे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत करून पुष्पवृष्टी केली व अल्पोहाराचे वाटप केले. यावेळी भगवान परशुराम यांच्या मूर्ती निर्माण कार्यासाठी राजेश राऊत, पंडित मनोज महाराज गौड, समीर अग्रवाल, बंकटलाल खंडेलवाल, शरद गादिया, प्रवीण शर्मा, मदनलाल खंडेलवाल, अॅड बलवंत नाईक, सारस्वत युवा संघ, आद्य गौड युवा संघ, मनोज दायमा रामेश्वर जोशी, श्रीमाळी समाज, जयप्रकाश श्रीमाळी यांनी आर्थिक मदत दिली सदरील कार्यक्रमाला मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष रामनिवास गौड मारवाडी युवा मंच चे प्रांतीय अध्यक्ष उमेश पंचारिया, अंकुशराव राऊत, दिगंबर पेरे, पंडित मनोज महाराज गौड , अॅड बलवंत नाईक, सिद्धिविनायक मुळे, यशवंत बदनापूरकर, किशन भक्कड, नितीन बागडी, राजेश उपाध्याय, अमित गौड, माधव शर्मा, मदन खंडेलवाल, जयप्रकाश श्रीमाली, उमेंद्र दाधिच, उमेश बजाज, साईप्रसाद मालपाणी, संजय सारस्वत, महेश सारस्वत, जगदीश गौड, दीपक त्रिवेदी, जितेंद्र ओझा, चंद्रप्रकाश श्रीमाली, पुरुषोत्तम श्रीमाली, प्रवीण शर्मा, ललित बिजावत, रणवीर मिश्रा, सिद्धांत शर्मा, अमरीश ओझा, मुरारी गौड, अनिल शर्मा, अशोक शर्मा, मनोज दायमा, रामेश्वर जोशी, भगवान दायमा, ओमप्रकाश दायमा, दिलीप व्यास, दीपेश व्यास, सूर्यप्रकाश ओझा, पंकज शर्मा, शरदकुमार व्यास, विष्णू खंडेलवाल, महेश खंडेलवाल, संतोष खंडेलवाल, गोविंद खंडेलवाल, कैलास चंदभणाणी, अरुण बजाज, गजानन ओझा, राकेश ओझा, अमरीश ओझा ,संदीप ओझा, शैलेंद्र शर्मा, राम शर्मा, अमित जोशी, नटवर ठाकूर, गोविंद श्रीमाली, सुदेश श्रीमाली, विजय शर्मा, कृष्णा श्रीमाली, प्रवीण व्यास,पियुष व्यास, यांच्यासह सुशीला शर्मा, साधना जोशी, ज्योती ओझा, मंजुश्री श्रीमाली, उर्मिला व्यास, कल्पना गौड, निर्मला मिश्रा, जयश्री शर्मा यांच्यासह आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...