आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघनसावंगी तालुक्यातील देवहिवरा येथील खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत जालना जिल्ह्याबरोबर सभोवतालच्या औरंगाबाद, परभणी, बीड या जिल्ह्यातील १०२ कुस्ती पहिलवानांनी या स्पर्धेत हजेरी लावून मोठ्या प्रमाणांवर बक्षिस प्राप्त केली आहे.यात पाचशे ७ हजारांपर्यंत बक्षिसे होते. जवळपास ७५ हजारांच्या बक्षिसांचे वितरण झाले.
देवहिवरा येथील खंडोबा हे देवस्थान सर्व गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून अनेक वर्षापासून येथे कुस्ती स्पर्धा ठेवण्यात येते, यासाठी बक्षिसाची रक्कम व इतर खर्च गावकऱ्यांच्या वर्गणीतून करण्यात येतो. सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने कुस्तीची आवड कायम ठेवण्यासाठी या स्पर्धेस हवी असणारी वर्गणीची रक्कम मोठ्या उत्साहाने देण्यात आली. कुस्ती खेळण्यापूर्वी पहिलवानाला मैदानात फिरवले जाते त्यांवर रक्कम लावून त्यांच्याशी कुस्ती खेळण्यासाठी ललकारी दिली जाते त्या पहिलवानांशी दुसरा पैलवान आव्हान देतो.
त्यावेळी कुस्ती लावण्यात येते याच काळात त्याला डफड्याच्या आवाजाने त्यांला प्रोत्साहन दिले जाते जो प्रतिस्पर्धीला पाडतो त्यांच्यावर बक्षिसाचा वर्षाव करण्यात येतो, अशा प्रकारे अनेक पहिलवानांनी कुस्त्या जिंकल्या आहेत.कुस्तीसाठी यंदा परिसरातील बाचेगाव, वडीरामसगाव, भांबेरी, भार्डी, मांदळा, गेवराई, राणीउंचेगाव, पानेवाडी यासह बीड, पैठण, जालना, औरंगाबाद, भाटेपुरी, मौजपुरी येथील पैलवानांनी हजेरी लावून कुस्ती स्पर्धेत सहभाग नोंदवला. यात युवकांचा जास्त भरणा होता जुन्या पैलवांनाकडून कुस्तीचे धडे ग्रामीण भागात घेऊन त्यांनी ठिकठिकाणी असलेल्या कुस्ती स्पर्धेत सहभाग घेऊन कुस्ती जिकुंन मिळालेल्या बक्षिसांची रक्कम कमी असली तरी कुस्ती खेळण्यांचा आनंद काही औरंच असून कुस्ती सभोवताली डफडे वाजवून कुस्तीच्या पहिलवानांना दिलेले उत्तेजन व कुस्तीवर मात केल्याचा आनंद पहिलवानांना उत्साहाचा वाटत होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुस्तीपटू विलास डोईफोडे, घनसावंगी तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुभाष बिडे यांची उपस्थिती होती.
या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी पांडुरंग चव्हाण, अशोक उगले, लक्ष्मण चव्हाण, कैलास वाघमारे, सुशील बरडे, नवनाथ लोणे, अनिरूध्द मते, नारायण शेंडगे, बडू शिंदे, बाळासाहेब गाढे, हरीश्चंद्र मते, विठ्ठल काळे, सोपानराव मते, अनिल बरडे, सिध्देश्वर शिंदे, शरद जवळकर, सुदामराव जवळकर, कल्याणराव मते, प्रकाश जवळकर, किसनराव शिंदे, दत्तात्रय मते, श्रीधरराव मते, सतिश उगले, विजयकुमार मते, नामदेव माने यांच्यासह गावकऱ्यांनी पुढाकार घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.