आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

भोकरदनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील सोयगावदेवी येथील राजू पुंडलिक सहाने (३५) या शेतकऱ्याने २ नोव्हेंबर रोजी रात्री ३ वाजता सततच्या नापिकीला कंटाळून स्वत:च्या शेतात विष प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान ५ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता त्यांचा मृत्यू झाला. सहाने यांच्याकडे ३ एकर कोरडवाहू शेती असून, सततच्या नापिकीला ते कंटाळले होते. परिणामी खासगी कर्ज, नातेवाइकांकडून केलेली उसनवारी कशी फेडायची या विवंचनेतून सहाने यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, आई असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...