आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळी:वीजप्रवाहाने घेतला एका तरुण शेतकऱ्याचा बळी

जालना6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उसाच्या शेतात एकाचा मृतदेह आढळल्याची घटना जालना तालुक्यातील वरूड येथे घडली. अरुण विष्णू म्हस्के (वरूड, ता. जालना) असे मृताचे नाव आहे. तालुका पोलिसांनी तपास केला असता वीजप्रवाहाने या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. वन्यप्राण्यांपासून पिकांचा बचाव होण्यासाठी बंधाऱ्याच्या कडेने शेतमालकाने तारेतून वीजप्रवाह सोडला होता.

म्हस्के हे २९ जुलै रोजी नाव्हा येथे बाजार करण्यासाठी गेले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी आले नाहीत. नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह वरूड शिवारातील उसामध्ये आढळला. नातेवाइकांनी त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल जारवाल हे करीत आहेत. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी गेले होते. शेतकऱ्याचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत तपास करीत असताना मृतदेहाच्या बाजूला एका तारेतून विद्युत प्रवाह सोडलेला असल्याचे दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...