आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हळहळ व्यक्त:क्षीरसागर गावात पाय घसरून‎ विहिरीत पडल्याने युवकाचा मृत्यू‎

भोकरदन‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विहिरीवरील विद्युत मोटार चालू करण्यासाठी‎ विहिरीवर गेलेल्या युवकाचा पाय घसरून‎ विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही‎ घटना रविवारी सकाळी नऊ वाजेच्या‎ सुमारास तालुक्यातील क्षीरसागर येथे घडली.‎ सुदर्शन उर्फ विजय शेषराव कोलते ( २०)‎ असे या घटनेत मृत झालेल्या युवकाचे नाव‎ आहे. आई-वडीलाला हा एकटाच असल्याने‎ गावात एकच हळहळ व्यक्त होत आहे.‎

भोकरदन तालुक्यातील क्षीरसागर येथील‎ रहिवासी असलेला सुदर्शन हा युवक रविवारी‎ सकाळी जनावरांना पाणी पाजण्यासाठी‎ स्वतःच्या विहिरीवरील विद्युत मोटार चालू‎ करण्यासाठी विहिरीवर गेला होता. मात्र,‎ विहिरीला कठडे नसल्याने त्याचा अचानक‎ तोल गेला व तो विहिरीत पडला. यादरम्यान‎ जवळपास कोणी नसल्याने ही घटना‎ कळायला वेळ लागला. काही वेळाने‎ परिसरातील तरुणांना ही घटना समजल्यानंतर‎ त्यांनी लगेच आरडाओरडा केला. ग्रामस्थांनी‎ त्याला विहिरी बाहेर काढून भोकरदन येथील‎ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र,‎ येथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून‎ त्याला मृत घोषित केले.‎

बातम्या आणखी आहेत...