आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीला जोडधंदा:रेशीम शेतीतून तरुणाची सहा महिन्यांत चार लाखांवर कमाई

विठ्ठल काळे | कुंभार पिंपळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतीला जोडधंदा असावा, म्हणून विनायकनगर येथील शेतकरी अंगद राजुरकर याने दोन एकरात रेशीम शेती सुरू केली आहे. एका वर्षात दोन महिन्याला एक असे पीक घेत वर्षात सहा पीक घेतली जातात. या शेतकऱ्याने तीन पिकांच्या माध्यमातून ९ क्विंटल ३५ किलो रेशीम कोष काढले आहते. यातून त्याला जवळपास ४ लाख ८० हजारांचे उत्पन्न मिळाले आहे.

घनसावंगी तालुक्यातील ग्रामीण भागातील विनायक नगर (राजूरकर कोटा) येथील शेतकरी अंगद गंगाधर राजूरकर यांनी आपल्या आठ एकर शेतीला जोडधंदा म्हणून आठ पैकी दोन एकर शेतीत रेशीम शेतीतून आर्थिक स्थैर्य मिळवले आहे. या शेतकऱ्याने निचरा होणाऱ्या जमिनीत पट्टा पद्धतीने तुती लागवड केली आहेे. तुतीची लागवड एकदा केल्यानंतर १५ वर्षांपर्यंत जिवंत राहत असल्याने दरवर्षी लागवड करावी लागत नाही. त्यामुळे लागवडीचा खर्च इतर पिकांप्रमाणे वारंवार येत नाही, पट्टा पद्धतीने तुतीची आंतरमशागत मजुरांऐवजी अवजाराने कमी खर्चात व कमी वेळेत वेळेवर करून घेता येत आहे.

रेशीम अळीचे अंडीपुंजातून बाहेर आल्यानंतर, पाच अवस्थेपासून संक्रमण करुन साधारणत २५ ते २६ दिवसानंतर पाला खाण्याचे प्रमाण कमी करते आणि तोंडावाटे सिल्क धागा सोडण्यास सुरुवात करते. या आळ्या कोष निर्मितीकरिता प्लास्टिकच्या चंद्रिकेवर सोडण्यात येतात. रेषीम अळी स्वतःभोवती धागा गुंडाळते आणि कोष बनविण्याची प्रक्रिया ४ ते ५ दिवसात पूर्ण होते. कोषावर आलेली अळी जवळपास हजार ते बाराशे मीटर लांबीचा धाग सोडते. एका प्लास्टिक चंद्रिकेवर ४०० ते ५०० कोष तयार होऊ शकतात.

साधारणपणे दोन एकर तुतीची लागवड केल्यानंतर ६० बाय २२ च्या एका शेड मध्ये ३०० ते ३५० अंडपुंज ठेवली जातात. रेशीम शेती, उद्योग करणारे शेतकरी आणि यातील जाणकार शेतकरी व तज्ञ यांच्याशी चर्चा केल्यावर हा उद्योग खरोखरच समृद्धी घडवून देणारा असल्याचे लक्षात येते. तुती झाडांची लागवडही प्रामुख्याने जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याच्या या कालावधीमध्ये केली जाते. कलमापासून तसेच तुती रोपाद्वारेसुद्धा लागवड करता येते. कलमापासून तुती लागवड केल्यास कमीत कमी ५ ते ६ महिन्यांत तुतीचे चांगले झाड तयार होते म्हणजेच तुतीची बाग हा रेशीम अळी संगोपनासाठी फायद्याचा ठरतो. अळी अवस्थेमध्येच फक्त तुतीचा पाला अळ्यांना खाऊ घातला जातो.

शेतीचा जोडधंदा म्हणून तरुणांनी याकडे वळावे
रेशीम अळीचे संगोपन करण्यासाठी रेशीम कीटक संगोपनगृह बांधणे आवश्यक आहे. रेशीम उद्योगातील तिसऱ्या भागात रेशीम अळीने कोष तयार केल्यानंतर कोष काढून घेऊन त्याची विक्री करता येते. शासनाकडूनही या रेशीम उद्योगासाठी अनुदान दिले जात असल्याने त्याची गरज आहे, अशी माहिती युवा शेतकरी यांनी दिली इतर पारंपरिक पिकांमागे न धावता रेशीम उद्योगाद्वारे स्वत:ला समृद्ध करण्याची गरज आहे अशी माहिती युवा शेतकरी अंगद राजूरकर यांनी सांगितली.

बातम्या आणखी आहेत...