आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:मतदान कार्डास आधार जोडणी सिंधी काळेगावात प्रतिसाद

सिंधीकाळेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथे प्रशासनाच्या वतीने आधार कार्ड ला मतदान कार्ड लिंक करण्यासाठी कँम्पला ग्रामस्थांकडून प्रतिसाद मिळत आहे. यावेळी सरपंच सुभाष गिराम, मुख्याध्यापक आबासाहेब रनशूर यांनी मार्गदर्शन केले. बोगस मतदान शोधण्यासाठी निवडणूक आयोगाने आधारला मतदान कार्ड लिंक करण्यासाठी विशेष मोहिमेला सुरुवात केली.

नागरिकांनी आपलं मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याचे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या परिवाराचे आधारला मतदान ओळखपत्र जोडणे करावे, असे आवाहन गावचे सरपंच सुभाष गिराम यांनी केले.

या वेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती गणेश खरात, ग्रामपंचायत सदस्य साळूकराम गिराम, भागवत गिराम, गोपीनाथ शेळके, जनार्धन गिराम, मुख्याध्यापक आबासाहेब रणशुर, गणेश गिराम,अरविंद गिराम, नामदेव मगर, आसाराम गिराम, जयराम गिराम, अशोक मगर, राजू गिराम, कैलास सूलाखे, पर्यवेक्षक नामदेव गायकवाड आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...