आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी घेतल्या मंडळांच्या भेटी:एकता मंडळाच्या गणेशाची पोलिस निरीक्षक बंटेवाड यांच्या  हस्ते आरती

चिखली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर तालुक्यातील चिखली येथे गणोशोत्सवानिमित्त बदनापूरॉ पोलिसांनी मंडळांच्या भेटी घेतल्या. विविध प्रकारचे उपक्रम राबवणाऱ्या मंडळ प्रतिनिधींचे कौतुक ही पोलिसांनी केले.

यावेळी एकता गणेश मंडळाच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करून पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या हस्ते आरती करण्यात आली. मागील वीस वर्षापासून एकता गणेश मंडळ सामाजिक उपक्रमात अग्रेसर असून, समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. कीर्तनातून जनजागृती, लोक मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम व त्याचबरोबर हिंदू मुस्लिम तसेच सर्व समाज बांधव मिळून हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. शिवाय विसर्जन मिरवणुकीत टाळ मृदंगासह भजनी मंडळाला सहभागी केले जाते. तर विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारे लेझीम पथकाचे सादरीकरणही या ठिकाणी होते.

यावेळी गणेश मंडळाचे अध्यक्ष अतुल देशमुख, उपाध्यक्ष कुंडलिक नरवडे अशोकराव देशमुख, देवेंद्र देशमुख, बाबासाहेब देशमुख, मोहन जैस्वाल, हरिदास गायकवाड, ऋषी मिसाळ, बालू गोलांडे, नूर सय्यद, जॉनी सय्यद , मुनाफ कुरेशी, रुपेश जैस्वाल, संजय दाभाडे ,गणेश शेळके, गजानन नरवडे, गजानन रेगुडे, विकास पिसाळ, आकाश गायकवाड, बाबासाहेब कुमकर, नितीन शिंदे, विलास रेगुडे, सुभाष रेगुडे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...