आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वेतांबर सोशल ग्रुप:अ.भा. जैन श्वेतांबर सोशल ग्रुप फेडरेशन राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्षपदी मुनोत दांपत्य; यांच्या  कार्याची दखल घेऊनच त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ.भा.जैन श्वेताम्बर सोशल ग्रुप फेडरेशनच्या राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्षपदी येथील उद्योजक गौतमसिंग मुणोत व डॉ. सोनाली मुणोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडीनंतर संघटनेच्या प्रगतीसाठी कार्य करत असतांनाच संघटनेच्या महाराष्ट्रात शंभर शाखा स्थापन करणार असल्याचा संकल्प मुणोत यांनी बोलून दाखवला.

अ.भा.जैन श्वेताम्बर सोशल ग्रुप फेडरेशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी समारंभ नुकताच इंदौर येथे पार पाडला. यावेळी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय नाहर, निवृत्तमान राष्ट्रीय अध्यक्ष पीयूष जैन, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष वीरेंद्रकुमार जैन, निवड समितीचे अध्यक्ष प्रकाश भटेवरा, स्थायी समितीचे अध्यक्ष राजेंद्र जैन, राष्ट्रीय चेअरमन नरेंद्र संचेती, राष्ट्रीय महासचिव अजय जैन, भरत शाह, प्रभात चोपडा, राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश सेलोत, हेमंत कोठारी, पारस मोदी, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रो. के. एल. जैन, कपील जोशी, अशोक मोदी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष अखिल चौधरी, राष्ट्रीय सचिव राकेश छाजेड, अजय सुराणा, सतीश सिंधवी, राष्ट्रीय प्रचार सचिव संदीप भंडारी आदींची उपस्थिती होती. सभेच्या प्रारंभीच निवड समितीचे अध्यक्ष प्रकाश भटेवरा यांनी मुणोत दाम्पत्यांचा परिचय दिला. गौतमसिंग मुणोत यांनी दुष्काळजन्य परिस्थितीत गायींची फार मोठ्या प्रमाणात सेवा केली. याशिवाय कोरोना कालावधीत देखील उल्लेखनिय कार्य केले आहे. कुबेर ग्रुपचे चेअरमनपद यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या मुणोत यांच्या कार्याची दखल घेऊनच त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले.

महाराष्ट्रात एकशे एक शाखा
आपल्या कार्यकाळात फेडरेशनची उत्तरोत्तर प्रगती होईल आणि संघटना प्रगती पथावर पोहोचेल यात शंका नाही. मैत्रीतून संघटन आणि संघटनेतून सेवा या ध्येयाने प्रेरित होऊन आपली टीम कार्य करेल. महाराष्ट्रातून आपली एकमेव निवड केल्याबद्दल आपण समितीचे आभार मानले. वरिष्ठांनी टाकलेला हा विश्वास सार्थ ठरवितांनाच संघटनेच्या उज्वल भविष्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येतील. संघटनेच्या उज्वल भविष्यासाठीच महाराष्ट्रातून आगामी काळात एकशे एक शाखांचे निर्माण करणार असल्याचे नवनिर्वाचीत राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष तथा उद्योजक गौतमसिंग मुणोत यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...