आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पळवून नेलेली मुलगी ताब्यात:पळवून नेलेली मुलगी मध्य प्रदेशातून पोलिसांच्या ताब्यात

मंठा8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक वर्षापूर्वी अल्पवयीन पीडित मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मंठा पोलिसांत पीडितेच्या नातेवाइकांकडून गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणाचा एक वर्षानंतर छडा लावण्यात मंठा पोलिसांना यश आले असून आरोपीला मध्य प्रदेशातील वाघोली येथून पीडितेसह ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा मागील एक वर्षापासून मंठा पोलिस शोध करीत होते.

सदरप्रकरणी पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, डीवायएसपी राजू मोरे, पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बलभीम राऊत, पो. कॉ. श्याम गायके, मनोज काळे, विजय जुबंडे यांनी तपास केला. याप्रकरणी प्रवीण अंकुश नवघरे (२५, तळणी, ता. मंठा) यास पीडित मुलीसह पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास मंठा पोलिस करीत आहेत.