आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण:पैशाच्या व्यवहारातून एकाचे अपहरण, चिंचखेड्यातील घटना

जालना24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैशाच्या कारणावरून एकाला शिवीगाळ करून पाच जणांनी अपहरण केल्याची घटना अंबड तालुक्यातील चिंचखेड फाट्यावर शनिवारी घडली. संतोष निवृत्ती मगरे (रा. चिंचखेड ता. अंबड, ह. मु. पुणे) असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

संतोष मगरे हे पुणे येथे कामाला आहेत. त्यांनी संशयित देविदास राठोड, विकास पवार, विनोद राठोड, (सर्व रा. पिंपरखेड), पंडित शेषराव चव्हाण, गणेश शिवदास राठोड (रा. राहुवाडी, ता. अंबड) यांच्याकडून पैसे घेतले होते. या पैशावरूनच त्यांच्यात वादावादी झाली होती. नंतर संतोष मगरे यांना पाचही संशयितांनी मारहाण करून शिवीगाळ केली. शनिवारी दुपारी संतोष मगरे हे अंबड तालुक्यातील चिंचखेड फाट्यावर चहा घेत होते.

दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पाचही संशयितांनी त्यांना शिवागीळ करून मारहाण केली. त्यानंतर संतोष मगरे यांना क्रुझर गाडीतून घेऊन गेले. याची माहिती नातेवाइकांनी अंबड पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक इंगळे यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी निवृत्ती हरिभाऊ मगरे यांच्या फिर्यादीवरून पाचही संशयितांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...