आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण:जालन्यातून राजस्थानात गेलेल्या दोघांचे अपहरण

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जालन्यातून दुचाकीवरून राजस्थान फिरायला गेलेल्या दोन मुलांचे अपहरण झाले. मुलांच्या नातेवाइकांना अपहरणकर्त्यांनी फोन करून ९५७१५६८५६१ या नंबरच्या फोनपेवर २ लाख पाठवा अन्यथा मुलांचा खून करू, अशी धमकी दिली. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक नंदू बडे (वय २२, धानोरा ता. गेवराई जिल्हा बीड), करण हिरालाल शेवाळे (वय २५, नारेगाव ता. औरंगाबाद) अशी अपहरण झालेल्या मुलांची नावे आहेत. जालना शहरातून दुचाकीवरून राजस्थानला ३१ डिसेंबर रोजी दोन मुले फिरायला गेले होते. परंतु त्यांचे अपहरण होऊन फोन पेवर खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी संतोष डोंगरे (हॉटेल चालक, रा. रोहीदासपुरा, जालना) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीचा एक मुलगा भाचा आहे तर दुसरा मुलगा त्याचा मित्र आहे. अपहरण झालेला एक मुलगा जालना येथे तर दुसरा औरंगाबाद येथील नारेगाव येथे राहत होता. ३१ डिसेंबर रोजी जालना शहरातून हे दोघे दुचाकीवरून फिरायला गेले आहेत. दरम्यान, बुधवारी व शुक्रवारी एका मोबाइलवर संपर्क साधून मुलांच्या नातेवाइकांना फोन करून दोन लाख रुपयांची फोन पेद्वारे मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...