आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाभार्थ्यांना डोकेदुखी:निराधारांसाठी उत्पन्नाची अट रद्द करा

सिंधी काळेगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावणबाळ निवृती वेतन योजना व संजय गांधी निराधार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी नव्याने उत्पनाचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ही अट लाभार्थ्यांना डोकेदुखी ठरत आहे. सदर अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे.

तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत राबविण्यात येत असलेल्या श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच संजय गांधी निराधार योजना आदी योजनेसाठी अगोदरच सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केलेली आहे. परंतु आता पात्र असलेल्या लाभार्थ्यांना दरवर्षी नव्याने उत्पन्नाचे प्रमाणात देणे बंधनकारक केले असल्याने लाभार्थ्यांना अनेक अडचनीचा सामना करावा लागत आहे. आठ दिवसांत सदरची किचकट अट रद्द करण्यात आली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष कृष्णा खलसे, हरिदास लांडे, श्रीकांत राठोड, राजू राठोड यांच्यासह आदींनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...