आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुष्काळ हा नेहमीच भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दावणीला बांधलेला. शिवाय सततच्या दुष्काळामुळे शेती व्यवसाय देखील धोक्यात आलेला. परंतु भोकरदन तालुक्यात जलयुक्त शिवार ही योजना शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण ठरली आहे. या योजनेतर्गंत तालुक्यात ठिकठिकाणी राबविण्यात आलेल्या नदी, नाले खोलीकरण व रुंदीकरणामुळे शेतकऱ्यांना पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब बांधावरच अडविण्यात यश आले आहे.
त्यामुळे कोरडवाहू शेतीला देखील आज बागायती शेतीचे स्वरुप जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून प्राप्त झाले असल्याचे परिसरातील शेतकरी सांगत आहे. भोकरदन तालुक्यात खरिप हंगामातील लागवडी योग्य क्षेत्र १ लाख ४ हजार ५२५ हेक्टर आहे. त्यात सरासरी १ लाख ८ हजार क्षेत्रावर लागवड केली जायची. मात्र जलयुक्त शिवाय योजनेमुळे शेतकऱ्यांकडे पाण्याचे साधन उपलब्ध झाल्याने सन २०२२-२३ मध्ये १ लाख ११ हजार ८५७ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची लागवड झाली. तर यावर्षी रब्बी हंगामात तब्बल ६७ हजार १७७ हेक्टरमध्ये मका, हरभरा, ज्वारी, गहू आदी पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. त्यात सर्वाधिक हरभरा पिकाचा पेरा आहे. जलयुक्त शिवार योजनेचे फलीत शेतकऱ्यांना दिसु लागले आहे. तालुक्यात दरवर्षी पावसाचे पडणारे पाणी वाया जात होते.
परंतु मागील पाच वर्षापूर्वी शेती विकासात वाढ होऊन शेती समृद्ध व्हावी यासाठी शासनाने गावागावात जलयुक्त शिवार योजनेचे काम प्रभावीपणे हाती घेतले व ते कृषी खात्याच्या माध्यमातून यशस्वी देखील करुन घेतले. आज तालुक्यात हजारो हेक्टर जमिनीला जलयुक्त शिवार योजनेचा फायदा झाला आहे. विहिरीची पाणी पातळी वाढली असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन दुपटीने वाढ झाली आहे. ज्या ठिकाणी साधे बाजरीचे पिक घेण्यासाठी शेतकरी घाबरत होते त्या ठिकाणी आता शेतकरी गहु व मकाचे पिक घेत आहे.तालुक्यात मागील दहा वर्षात जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत मोठ्या प्रमाणात सिमेंट बंधाऱ्याची कामे करण्यात आली आहे. दरम्यान दानापूर येथील जुई धरण, पद्मावती धरण, शेलुद येथील धामना धरण, पळसखेड दाभाडी, बानेगाव मध्यम प्रकल्प या धरणातील पाणी साठ्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीचे क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.
केळना, पूर्णा, गिरीजा या नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्या तालुक्यातील सिंचनाचा अनुशेष भरून निघाला आहे. शिवाय तालुक्यातील शेतकऱ्यांची मशागत करण्याची क्षमता वाढलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत मोठा बदल होण्यास मदत होताना दिसत आहे. भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार योजना संजीवनी ठरली आहे. शिवाय जलयुक्त शिवार योजनेसोबतच लोकसहभाग,नाम संस्था,मुबंई येथील ईंडियन पल्सेस संघटनेने देखील यामध्ये पुढाकार घेतला आहे.
जलयुक्त शिवार वरदान
जलयुक्त शिवार योजना भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी वरदान ठरली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून २०१४ ते २०१९ या काळात १ हजार पेक्षा जास्त कामे या योजनेतून झाली. शिवाय बानेगाव, पळसखेड दाभाडी, रेलगाव या धरणाची कामे झाली. त्यामुळे २०१४ च्या तुलनेत सिंचनाचे क्षेत्र दहापट वाढले आहे.जलयुक्त शिवार योजनेतुन तालुक्यातील दुष्काळ पुसण्यास मदत झाली आहे. - संतोष दानवे, आमदार भोकरदन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.