आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलीस बळजबरीने पळवून नेत लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना जालना शहरातील एका भागात घडली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून महादेव चंद्रकांत घुले यांच्यासह चार जणांविरोधात कदीम जालना ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात एका महिला आरोपीचाही समावेश आहे. १९ वर्षीय तरुणी घरात एकटी असताना मधुबन काॅलनी येथील महादेव घुले याने ९ जून २०२२ रोजी लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पुन्हा १८ जून रोजी महादेव घुले, चंद्रकांत घुले, अंबादास सुरासे यांनी यशवंतनगर येथून मुलीस बळजबरीने पळवून नेऊन मधुबन काॅलनी येथे डांबून ठेवत महादेव घुले यांच्यासोबत शारीरिक ठेवण्यास भाग पाडले.

बातम्या आणखी आहेत...