आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्ष १९८९ - ९० मध्ये लालपरीचे स्टेअरींग हाती घेतले. त्यावेळी वाहणांची संख्या कमी होती. मात्र, खडतर रस्ते हे मोठे आव्हाण होते. आता काळ बदलला वाहणे वाढली आहे. पण रस्ते चांगली आहेत. या परस्पर असलेल्या बाबींचा विचार करता वाहन चालकाने थोडा सय्यम ठेवला, घाई केली नाही तर अपघात टाळता येतात.
असे एसटी महामंडळात २५ वर्ष सेवा देणारे जाफराबाद आगाराचे सेवानिवृत्त चालक भास्कराव देशमुख यांनी सांगीतले. सेवेची २५ वर्ष पुर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील १५ "सदिच्छादूत'' यांचा एसटी महामंडळाकडून गौरव केला जाणार आहे. सर्वसामान्यांची लालपरी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या एसटी बसच्या माध्यमातुन आजही मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये जा होते.
या सेवेचे ७५ वर्ष लालपरी ने ओलांडले आहे. एसटीच्या माध्यमातून प्रवाशांना ज्यात विद्यार्थी ते जेष्ठ, महिला अशा सर्वांना विविध योजनांतून प्रवास सवलत दिली जाते. या बराेबरच सारथी म्हणुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही गौरव केला जातो. यामध्ये सदिच्छादूत म्हणुन गौरवण्याचा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विना अपघात सेवा देणारे एसटी वाहक हे एसटीचे "सदिच्छादूत'' (ब्रँड अम्बॅसिडर) ठरत आहेत. अशा चालकांचा सपत्निक सत्कार करून इतर चालकांसमोर आदर्श निर्माण करणे व त्यांना प्रोत्साहन देणे, या उद्देशाने सदिच्छादुतांचा २६ जानेवारी सपत्नीक हा सत्कार होणार आहे.
१५ जणांचा सपत्नीक सत्कार
१५ जणांचा आज सपत्नीक सत्कार असून, २५ हजारांचा चेक, मोमेंटो, प्रमाणपत्र, बॅच आदीसह पत्नीचा खण - नारळाने ओटी भरली जाणार आहे. हा कार्यक्रम एसटीचे विभागीय कार्यालय येथे होणार आहे. यंत्र अभियंता, वाहतूक अधिकारी, कर्मचारी अधिकारी आदींची यावेळी उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, ११ ते २५ जानेवारी सुरक्षितता अभियान पंधरवडा राबवण्यात आला.
विना अपघात सेवा देणारे "सदीच्छादूत''
२५ वर्षे विना अपघात सेवा देणाऱ्या सदीच्छादूत यांचा गौरव करून चालकांना आदर्श मिळावा यासाठी जिल्ह्यातील १५ कर्मचाऱ्यांचा गौरव केला जात आहे. -प्रमोद नेव्हुल, विभाग नियंत्रक, जालना
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.