आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील महाराष्ट्र बँकेत नेहमी कामकाज ठप्प होत असल्याने बँकचे खातेदार त्रस्त झाले आहेत. रांजणी येथे राष्ट्रीयकृत महाराष्ट्र बँकेची शाखा असून या बँकेस परिसरातील जवळ पास वीस पंचवीस गावे जोडलेली आहे. त्यामुळे या बँकेत स्थानिक व परिसरातील व्यापारी छोटे व्यावसायिक, जेष्ठ व दिव्यांग नागरिक, शालेय विद्यार्थी या सारख्या खातेदारांची ये जा असते. परंतु खंडीत वीज पुरवठ्याच्या नावाखाली कामकाज ठप्प ठेवण्यात येते. कामकाज ठप्प झाल्यामुळे आर्थिक व्यवहार बंद होतात.
त्यामुळे खातेदारांची ससेहोलपट होत आहे. विशेष म्हणजे या बँकेत इन्व्हर्टरची सुविधा उपलब्ध असुन ही त्याचा उपयोग होत नाही. बँकेचे वरिष्ठ अधिकारी परंजय ठाकूर यांनी सांगितले, सदरील इन्व्हर्टरची बॅटरी खराब असल्याने चार्जिंग होऊनही ते सपोर्ट करत नाही. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला तर कामकाज बंद पडते. एकंदरीत या व्यत्ययामुळे ग्राहक नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.