आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकूने गळा चिरुन पतीकडून पत्नीचा खून:आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात; जालनामधील धक्कादायक प्रकार

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतीच्या त्रासाला कंटाळुन माहेरी आलेल्या पत्नीचा पतीने धारदार शस्त्राने गळा चिरुन निर्घुण खून केल्याची घटना जालना तालुक्यातील कुंबेफळ येथे गुरुवारी दुपारी 3.00 वाजेच्या सुमारास घडली . रमाबाई लाला कदम (27) असे मृत विवाहीतेचे नाव आहे.

पतीकडून हुंड्यासाठी छळ

पती मारहाण करीत असल्याने वडिलांनी आठ दिवसापूर्वीच मुलीला माहेरी आणले होते. परंतू, तिच्या पतीने माहेराला येऊन ही हत्या केल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे. जालना तालुक्यातील कुंबेफळ येथील भागाजी आचलखांब यांची मुलगी रमाबाई हिचे नुतनवाडी येथील लाला कदम याच्या सोबत लग्न झाले होते. लग्नानंतर पतीकडुन हुंड्यासाठी छळ होत असल्याने रमाबाई माहेरी कुंबेफळ येथे राहायची. दरम्यान, गुरुवारी पती माहेरी कुंबेफळ येथे आल्यानंतर काही वेळातच पतीने धारदार शस्त्राने पत्नीचा चाकुने गळा चिरुन खून केला.

3 मुलांची होती आई

घटनेची माहीती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत विवाहितेला तीन मुले असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, खून करणाऱ्या पती लाला कदम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संध्याकाळी मृत विवाहितेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.

असे काही होईल वाटलं नव्हतं

जावई सकाळी घरी आला, नातेवाईकांसोबत चर्चा करीत होता. आम्ही गुरे चारण्यासाठु शेतात गेलो. परंतु, काही वेळानंतर हा प्रकार झाल्याची माहिती मिळताच, घरी आलो, तर हे दृश्य दिसून आल्याचे मृत विवाहीतेच्या नातेवाईकांनी सांगितले.

एका क्षणात होत्याचं नव्हंत झालं

मिस्तरी काम करीत असलेला लाला कदम लाला कदम याने खून करण्याच्या उद्देशाने कुंबेफळ येथे येत असतानाच चाकू सोबत घेऊन आला होता. पत्नी सोबत चर्चा करताना त्याची बहीणही त्या ठिकाणी होती. परंतु फोन आल्यामुळे त्याची बहीण बाहेर गेली असता काही क्षणातच कदम याने पत्नीच्या गळ्यावर वार केले.

बातम्या आणखी आहेत...