आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक केल्याचा आरोप:जीडीसी काॅइन घोटाळ्यातील आरोपींना पोलिस कोठडी

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीडीसी काॅइनच्या माध्यमातून बनावट वेबसाइटद्वारे शेकडो लोकांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या चार आरोपींना ८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी या आरोपींकडून आणखी माहिती घेण्यासाठी यांची कोठडी उपयुक्त ठरणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, किरण खरात यांच्या अटकपूर्व जामीनावरची सुनावणी ७ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी जालना आर्थिक गुन्हे शाखेने पुणे आणि इचलकरंजी येथून चार आरोपींना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी या आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले. त्या वेळी त्यांना ८ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सध्या जालन्यातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून जीडीसी काॅइन घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान अटक चौघांच्या ताब्यातून ४ महागड्या गाड्यादेखील जप्त करण्यात आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक बी.डी फुंदे, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन, पोलिस अंमलदार फुलचंद गुसिंगे, गजू भोसले, गोपाल गोसिक, धीरज भोसले, ज्ञानेश्वर खराडे यांनी आरोपींना न्यायालयात हजर केले.

बातम्या आणखी आहेत...