आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:तरुणाच्या डोक्यात गट्टू मारणारा आरोपी ताब्यात ; 19 ऑक्टोबर रोजी दिली फिर्याद

सेलूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सेलू शहरातील उपजिल्हा रुग्णालय परिसरात एका ३२ वर्षीय तरुणाच्या डोक्यात गट्टू मारून गंभीर जखमी केले होते. या प्रकरणात गुन्हा दाखल होताच फरार झालेल्या आरोपी आकाश जगदाळे यास पोलिसांनी सेलू-परभणी रस्त्यावरील फिल्टर प्लँट परिसरात १ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले. शेख अकबर शेख बाबू हे आपल्या आजारी पत्नीला दवाखान्यात दाखल केल्यानंतर भेटण्यास गेले असता त्यांच्या दुचाकीवर दगड मारून नुकसान करत असताना आवाज ऐकून बाहेर आलेल्या शेख अकबर याने दुचाकीवर दगड मारू नका, असे म्हणताच परिसरातील सिमेंटचा गट्टू डोक्यात मारून गंभीर जखमी केले.

याप्रकरणी १९ ऑक्टोबर रोजी शेख अकबर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकाश जगदाळे व अन्य एका अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर फरार असलेला आकाश जगदाळे यास परभणी रस्त्यावर असलेल्या फिल्टर प्लँट परिसरात सहायक पोलिस निरीक्षक सुनील अंधारे, पोलिस नायक दुबे, पोलिस नाईक राहुल मोरे, पोलिस नाईक उमेश बारहाते यांच्या पथकाने ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात हजर केले आहे.

बातम्या आणखी आहेत...