आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा:आरोपीला सहा महिन्यांसाठी चांगल्या वर्तणुकीची शिक्षा

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एस. गोरे यांनी आरोपी अर्जुन संजय राऊत (रा. जालना) याला सहा महिन्यांसाठी गुरुवारी चांगल्या वर्तणुकीची शिक्षा सुनावली असून आरोपीकडून बाँडवर लेखीसुद्धा घेण्यात आले आहे. शिवाय १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अर्जुन राऊत याने १७ जून २०१५ रोजी सहायक पोलिस अधीक्षकांच्या दालनात आरडाओरडा करत पोलिसांना शिवीगाळ केली होती.

शिवाय फिर्यादी रामदास विक्रम काकडे, पोलिस कर्मचारी हे काम करत असताना त्यांच्या टेबलावरील फाइल फेकून दिल्या. नंतर पोलिस कर्मचारी अनिल काळे यांना धक्काबुक्की करीत फिर्यादीची गळचेपी धरून अरेरावीची भाषा केली. सदर बाजार ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिस निरीक्षक ए. के. विभुते यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने आरोपीला १५ हजारांचा दंड व ६ महिन्यांसाठी चांगल्या वर्तणुकीची शिक्षा सुनावली. तसे आरोपीकडून बाँडवरदेखील लिहून घेण्यात आले आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता ए. डी. मते यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...