आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेरबंद:कोठडीतून पळालेला आरोपी नळणीत जेरबंद

श्री क्षेत्रराजूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हसनाबाद पोलिसांच्या कोठडीतून पळालेल्या संशयित आरोपीला पोलिसांनी नळणी येथील काळूबाबा यात्रेतून शुक्रवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. राजू शेषराव माळी (रा.टाकळी माळी, जि. औरंगाबाद) असे संशयिताचे नाव आहे.

हसनाबाद पोलिस ठाण्यात राजू माळी याच्या विरुध्द बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. यामुळे त्याला पोलिसांनी त्याला १० नोव्हेंबर रोजी अटक केली होती. दरम्यान, पोलिस कोडठीमध्ये असताना १३ रोजी जेवण केल्यानंतर डबा धुण्याच्या बहाण्याने बाहेर आल्यानंतर माळी हा पळून गेला होता. तेव्हापासून पोलिस त्याचा शोध घेत होते.

दरम्यान, संशयित नळणी येथील काळूबाबा यात्रेत फिरत असल्याची माहिती भोकरदन व हसनाबाद पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यास शिताफीने ताब्यात घेतले. संशयिताला आज न्यायालयासमोर हजर केले असता, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आल्याचे घोडके यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...