आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आवडत्या क्षेत्रात मेहनत घेऊन यशोशिखर गाठा; प्रा.संभाजी तांगडे यांचे प्रतिपादन

परतूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनाची परीक्षा शालेय परीक्षेपेक्षा वेगळी असली तरी, जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करून त्यावर विजय मिळविण्याचे कसब काही अंशी शालेय अभ्यासक्रमातुन शिकविले जाते. या दृष्टिकोनातून शालेय परीक्षेतील यश तितकेच महत्त्वाचे आहे. कुठल्याही क्षेत्राला कमी न लेखता, आपल्या आवडीच्या क्षेत्रात मेहनत घेतल्यास निश्चितपणे यशोशिखरावर पोहचता येते, असे मत अभिनेते प्रा.संभाजी तांगडे यांनी व्यक्त केले.

लायन्स क्लबच्या वतीने मंगळवारी शहरातील लायन्स क्लब हॉलमध्ये बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविण्याऱ्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनोहर खालापूरे, प्रशांत राखे, बबनराव उन्मुखे, प्रा. प्रमोद टेकाळे, तुकाराम ऊबाळे, प्रशांत पुरी आदींची उपस्थिती होती. तांगडे म्हणाले, ज्या क्षेत्रात आपण कार्यरत आहोत, त्या क्षेत्रातील सर्वोच्य स्थानावर जाण्याचा आपला ध्यास असला पाहिजे.निश्चिय ध्येय पुढे ठेवून केलेली कामगिरी यश मिळवून देते. यशाच्या मार्गात अनेकवेळा अपयशाचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी संयम आणि भावनांवर नियंत्रण मिळविणे आवश्यक असते.

यावेळी बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या गजानन देवडे, प्रीती जोगदंड, रोशनी बोरकर, ज्ञानेश्वर लाटे, प्रांजल चामणीकर, महेक मोर, अस्मिता राऊत, सुप्रिया शेळके, इशा तेलगड, शरयू गिरी, ओंकार काबरे, संस्कृती बाबर, दिव्या गुंजमुर्ती, श्रुती लहाने, स्वाती गुंजमुर्ती या बारावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...