आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंदनझीरा पोलिसांनी कारवाई:चंदनझिरा हद्दीत जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई

चंदनझिरा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदनझीरा हद्दीत जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर चंदनझीरा पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिंदे, जितेंद्र तागवाले, अशोक जाधव, कैलास बारवाल यांनी केली आहे. यात पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले आहे.

एका जणाच्या पत्र्याच्या शेडमध्ये हा जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. आता रंगपंचमी असल्यामुळे जागोजागी जुगार खेळण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अशा जुगाऱ्यांवर कारवाया करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडूनही कारवाया केल्या जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...