आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील काही राज्यांमध्ये फळबागांची लागवड न करताच फळबाग योजनेचे अनुदान लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील फळ पीक विम्याचा लाभ घेणाऱ्या सर्वच क्षेत्राची क्षेत्रीय पाहणी महसूल व कृषी विभागाकडून हाती घेण्यात आली आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. दरम्यान, सर्व प्रकाराची माहिती कृषी आयुक्तालयाकडून मागवण्यात आली आहे. राज्यात पुनर्रचित हवामान आधारित विमा योजनेअंतर्गत आंबिया बहारमधील विमा संरक्षित क्षेत्राची तपासणी करण्याचा निर्णय नुकताच झाला आहे.
जालना जिल्ह्यात केळी, द्राक्षे, आंबा, मोसंबी, संत्रा, पपई तसेच डाळिंब या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे. मात्र, या पिकांसाठी जो विमा काढला जातो त्यामध्ये बोगस प्रकार झाल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे. एजंटांनी हे प्रकार केल्याची बाब काही ठिकाणी आली आहे. यामुळे जिल्ह्यातील फळ पीक सर्वच क्षेत्राची महसूल तसेच कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने क्षेत्रीय पाहणी केली जाणार आहे.
वर्षभरात तब्बल २६ हजार हेक्टरने विमा संरक्षित क्षेत्रात वाढ जालना जिल्ह्यात अंबिया बहार २०२२ मध्ये शेतकऱ्यांनी एचडीएफसी इर्गो जनरल इंन्शुरन्स कंपनीकडे फळपिक विम्यापोठी ३७ हजार ८८४.६९ हेक्टर क्षेत्रावर विमा संरक्षण घेतले आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात २१ हजार हेक्टर क्षेत्र अंदाजीत आहे. तर २०२१ मध्ये हे क्षेत्र ११ हजार ४२८ हेक्टर इतके होते. यामध्ये एका वर्षात तब्बल २६ हजार हेक्टरने विमा संरक्षीत क्षेत्राची वाढ झाली आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र वाढ ही डाळिंब तसेच मोसंबी या पिकांमध्ये झाली आहे. ही तफावत एजंटांच्या गैरकारभाराची पावतीच देत आहे.
इतर राज्यात बोगस प्रकार जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना राबवली जातो. यासाठी मोठ्या प्रमाणात नाेंदणी होते. दरम्यान, इतर राज्यांत याचा बोगस प्रकार हाेत असल्याच्या बाबी आढळून आल्या आहेत. यामुळे फळ पिकांची महसूल तसेच कृषी विभागाकडून क्षेत्रीय तपासणी होणार आहे. याचा अहवाल कृषी आयुक्तालयाने मागवण्यात आला आहे. भीमराव, रणदिवे, अधीक्षक कृषी अधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.